‘यूपीएससी’ परीक्षेत चाणक्य मंडलचे घवघवीत यश

‘यूपीएससी’ परीक्षेत चाणक्य मंडलचे घवघवीत यश

पुणे, २३ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादित केले आहे. देशात पहिली आलेली इशिता किशोरे आणि राज्यात पहिली आलेली ठाण्याची कश्मिरा संखे या दोघींनी चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गदर्शन घेतले आहे.

यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाने एकूण ९३३ जागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे. आयोगाच्या गुणवत्ता यादीतील तब्बल २८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. देशातील गुणवत्ता यादीत पहिल्या दहामधील चार, तर २५ मधील नऊ आणि शंभरमधील ३२ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गदर्शन घेतले. ‘‘गेल्या २६ वर्षांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या चाणक्य मंडल परिवारने आजवर हजारो ‘कार्यकर्ता अधिकारी’ राज्याला आणि देशाला दिले आहेत. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी घडवण्यासाठी कार्यरत असलेली संस्था, अशी चाणक्य मंडल परिवारची ओळख आहे. केंद्रीय लोकसेवा (यूपीएससी) परीक्षेत विक्रमी निकाल नोंदवत असतानाच यावर्षी निवडले गेलेले चाणक्य मंडलचे विद्यार्थी देशाच्या जवळपास सर्व राज्यांतून आहेत. मागील पाच वर्षांपासून चाणक्य मंडल दिल्लीतही अभिरूप मुलाखतींचे आयोजन करत असून देशभरातील विद्यार्थ्यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे,’’ असे चाणक्य मंडलचे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.
‘‘परीक्षेत उत्तरे कशी लिहावीत, त्यासाठी लागणारी तयारी कशी करावी, याबद्दल धर्माधिकारी सरांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले, अशी प्रतिक्रिया कश्मिरा यांनी दिली. तसेच देशात पहिल्या आलेल्या इशिता किशोरे यांनी धर्माधिकारी सरांनी मुलाखतीसाठी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग झाल्याची प्रतिक्रिया दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com