‘शासन आपल्या दारी’चा ३५ हजार नागरीकांना लाभ

‘शासन आपल्या दारी’चा ३५ हजार नागरीकांना लाभ

पुणे, ता. २४ : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील ३५ हजार नागरिकांना विविध योजनांचे प्रत्यक्ष लाभ दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली. येत्या ३० मे रोजी एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या शिबिरात सुमारे सव्वा लाख नागरिकांना योजनांचे लाभ देण्याचे उदिष्ट ठेवले आहे, असेही त्या म्हणाल्या.
राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कदम म्हणाल्या, ‘‘महसूल, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, कृषी, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रोजगार, कामगार, नगरविकास, ऊर्जा, सहकार, विविध विकास महामंडळे यांच्या योजनांचा लाभ या शिबिरातून देण्यात आला.’’ उत्पन्नाचे दाखले, रहिवास, वय, अधिवास दाखले, शेतकरी दाखला, रेशनकार्ड वाटप, आधार कार्ड नोंदणी किंवा दुरुस्ती यासह विविध विभागांचे प्रत्यक्ष लाभ वाटप करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com