‘एलिगंज’ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एलिगंज’ प्रदर्शन
‘एलिगंज’ प्रदर्शन

‘एलिगंज’ प्रदर्शन

sakal_logo
By

अजय चांडक यांनी क्युरेट केलेल्या ‘एलिगंज’ या अनोख्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते होणार आहे. यात चित्रे, शिल्पे आणि मिश्र माध्यम कलाकृती पाहायला मिळणार आहेत. चांडक यांच्यासह मिलिंद मुळीक, संजय देसाई, सुब्रत दास, संजीव जोशी आदी ३० कलाकार यात सहभागी झाले आहेत.
केव्हा ः गुरुवार (ता. २५) ते रविवार (ता. २८)
कधी ः सकाळी ११ ते सायंकाळी ७
कुठे ः राजा रविवर्मा कलादालन, घोले रस्ता

‘स्वरमयी गुरुकुल’ ः
‘स्वरमयी गुरुकुल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या नव्वदपूर्तीनिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ‘नाही चिरा, नाही पणती’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांचे व्याख्यान होणार आहे. यात डॉ. ढेरे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी अल्पज्ञात व बहुतांश अज्ञात स्त्रियांच्या योगदानाची दखल घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी ‘डॉ. प्रभा अत्रेजी के तराने : एक सौंदर्य विचार’ हा कार्यक्रम ज्येष्ठ गायिका प्रा. अंजली मालकर सप्रयोग सादर करणार आहेत.
केव्हा ः शुक्रवार (ता. २६) व शनिवार (ता. २७)
कधी ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः स्वरमयी गुरुकुल, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर, शिवाजीनगर

‘प्रभातस्वर’ ः
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि गायिका अपर्णा केळकर यांच्यातर्फे ‘प्रभातस्वर’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभातकालीन रागांचे सादरीकरण हे प्रभातस्वर मैफिलीचे वैशिष्ट्य असून कलाकारांचे सादरीकरण आणि त्यांच्याशी संवाद असे याचे स्वरूप आहे. या मैफिलीत यंदा पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पंडित उपाध्ये यांना मुकेश जाधव तबल्याची साथ करणार असून मंजिरी धामणकर संवाद साधणार आहेत.
केव्हा ः रविवार (ता. २८)
कधी ः सकाळी ६.३० वाजता
कुठे ः गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारातील ज्ञानवृक्ष, डेक्कन जिमखाना

‘तू सूर्याचे तेज’ ः
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘तू सूर्याचे तेज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत
धनश्री लेले यांचा ‘सावरकरांची अंदमानातील कविता’ हा कार्यक्रम, ‘त्या तिघी’ या कादंबरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या कवितांवरील नृत्यमय सादरीकरणाचा ‘सागरा प्राण तळमळला’ हे कार्यक्रम सादर होतील. त्यानंतर युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ हा सांगीतिक कार्यक्रम प्रस्तुत होईल.
केव्हा ः रविवार (ता. २८)
कधी ः सकाळी ९.३० ते रात्री १०
कुठे ः पंडित फार्म, डी. पी. रस्ता, एरंडवणे