
नानासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराचे वितरण
पुणे, ता. २४ : राजरत्न जनरल कै नानासाहेब शिंदे पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. नानाजीराव शिंदे प्रतिष्ठान व शिंदे घराण्याच्या वतीने प्रथम पुरस्कार नारायणपूर येथील सदगुरू अण्णा महाराज यांना प्रदान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रासाठी कै. माजी आमदार राजाराम शिंदे, क्रीडा क्षेत्रासाठी अशोक शिंदे, शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉ. पी. डी. पाटील, उद्योग क्षेत्रासाठी सुभाष काटे, आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येरवडा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे पार पडलेल्या पुरस्कार कार्यक्रमाला कर्नल सुरेश शिंदे, कॅप्टन श्रीराम भोसले, प्रतापराव शिंदे, श्रीराम वयाविनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बळिराम शिंदे, श्री क्षेत्र नारायणपूर दत्तमंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत नाना क्षिरसागर आदी उपस्थित होते. संस्थापक विश्वस्त रमेश शिंदे यांनी या संबंधी माहिती दिली.
नारायणपूर : सदगुरू अण्णा महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.