Wed, October 4, 2023

कियान फाउंडेशनतर्फे
कला प्रदर्शनाचे आयोजन
कियान फाउंडेशनतर्फे कला प्रदर्शनाचे आयोजन
Published on : 24 May 2023, 3:56 am
पुणे, ता. २४ ः कियान फाउंडेशनतर्फे कोलकता येथील कलाकार रिचा दालमिया यांच्या कलाकृतींच्या ‘नेचर्स सिम्फनी’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फिंगर पेटिंग’ या प्रकारात विशेष प्रावीण्य मिळवून स्वतःची अनोखी शैली विकसित करण्याऱ्या दालमिया यांची विविध चित्रे यात पाहायला मिळतील.
बाणेर परिसरातील वर्षा पार्क येथील कियान आर्ट गॅलरी येथे ३ ऑगस्टपर्यंत खुले असणार आहे. या प्रदर्शना दरम्यानच लहान मुलांसाठी ‘फिंगर पेंटिंग्ज’ तयार करण्यासाठी एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (ता. २७)
दुपारी ३ ते ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. अधिकाधिक लोकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, तसेच प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.