‘स्वतंत्रते भगवती’ कार्यक्रमाचे सादरीकरण

‘स्वतंत्रते भगवती’ कार्यक्रमाचे सादरीकरण

पुणे, ता. २४ ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा, त्यांच्या जीवनातले अपरिचित वैयक्तिक पैलू, विज्ञाननिष्ठ सावरकरांचा घरातील असलेला दृष्टिकोन, त्यांनी स्थानबद्धतेत असताना लिहिलेले साहित्य व नाटके, मातृभाषेविषयीचा त्यांचा आदर, असे अनेक प्रसंत व पैलू ‘स्वतंत्रते भगवती’ या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडले.

‘वीरभूमी परिक्रमा-स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहां’तर्गत ‘संस्कार भारती पुणे महानगरा’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि नारायणराव सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाची संकल्पना, संशोधन व संहिता लेखन डॉ. नयना कासखेडीकर यांचे होते. त्यांच्यासह सीमा भोळे, माधुरी जोशी आणि ॲड. स्नेहा पिंगळे-जोशी यांनी सादरीकरण केले. त्यांना तबल्यावर दत्ता देशपांडे यांनी आणि संवादिनीवर मिलिंद मराठे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी अक्षय जोग, काशिनाथ देवधर, रवींद्र जोशी, डॉ. भावार्थ देखणे, स्मिता गोडसे आणि संस्कार भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धनश्री देवी यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com