बारावी निकालाचा टक्का घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावी निकालाचा टक्का घसरला
बारावी निकालाचा टक्का घसरला

बारावी निकालाचा टक्का घसरला

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १२ लाख ९२ हजार ४६८ म्हणजेच तब्बल ९१.२५ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या (२०२२) तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.
बहुप्रतिक्षेत असलेला राज्य मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांच्या १४ लाख २८ हजार १९४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के असा सर्वाधिक असून मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी निकाल आहे. तर उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.
या परीक्षेसाठी ३५ हजार ८७९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ७७५ विद्यार्थी (४४.३३ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील २९ हजार ५२६ विद्यार्थी (८२.३९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात सहा हजार ७२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील पाच हजार ६७३ (९३.४३ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

निकालाची वैशिष्ट्ये
- ९३.४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
- एकूण १५४ विषयांची झाली परीक्षा
- २३ विषयांचा निकाल १०० टक्के
- दोन हजार ३६९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के (विज्ञान)
- क्रीडा प्रकारात सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी : १८,०४८
- ३३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
- शून्य टक्के निकालाची महाविद्यालये : ३१ (कला), १७ विज्ञान
- इंग्रजीच्या चुकलेला प्रश्न सोडविल्याचा प्रयत्न केलेल्यांना मिळाले सहा गुण

गेल्या चार वर्षांतील शाखानिहाय निकालाची टक्केवारी
शाखा : २०२० : २०२१ : २०२२ : २०२३
विज्ञान : ९६.९३ टक्के : ९९.४५ टक्के : ९८.३० टक्के : ९६.०९ टक्के
कला : ८२.६३ टक्के : ९९.८३ टक्के : ९०.५१ टक्के : ८४.०५ टक्के
वाणिज्य : ९१.२७ टक्के : ९९.९१ टक्के : ९१.७१ टक्के : ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ८६.०७ टक्के : ९८.८० टक्के : ९२.४० टक्के : ८९.२५ टक्के

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल
तपशील : मुले : मुली : एकूण
नोंदणी झालेले : ७,७४,१५५ : ६,५४,०३९ : १४,२८,१९४
परीक्षा दिलेले : ७,६७,३८६ : ६,४८,९८५ : १४,१६,३७१
उत्तीर्ण विद्यार्थी : ६,८४,११८ : ६,०८,३५० : १२,९२,४६८
उत्तीर्णतेची टक्केवारी : ८९.१४ टक्के : ९३.७३ टक्के : ९१.२५ टक्के

विद्यार्थ्यांचा शाखानिहाय निकाल
शाखा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : ६,४९,७५४ : ६,२४,३६३ : ९६.०९ टक्के
कला : ३,८७,२८५ : ३,२५,५४५ : ८४.०५ टक्के
वाणिज्य : ३,३५,८०४ : ३,०३,६५६ : ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ४०,२७४ : ३५,९४८ : ८९.२५ टक्के
आयटीआय : ३,२५४ : २,९५६ : ९०.८४ टक्के

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
विभागीय मंडळ : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : ९३.३४ टक्के

नागपूर : ९०.३५ टक्के
औरंगाबाद : ९१.८५ टक्के
मुंबई : ८८.१३ टक्के
कोल्हापूर : ९३.२८ टक्के
अमरावती : ९२.७५ टक्के
नाशिक : ९१.६६ टक्के
लातूर : ९०.३७ टक्के
कोकण : ९६.०१ टक्के

श्रेणीनिहाय उत्तीर्णतेची माहिती
तपशील : विद्यार्थ्यांची संख्या
९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ७,६९६
८५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १९,५६९
८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ३९,०५२
७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ६५,३५६
७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ९६,४००
६५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,३१,४१३