सनातन संस्थेतर्फे हिंदू एकता दिंडीचे आयोजन

सनातन संस्थेतर्फे हिंदू एकता दिंडीचे आयोजन

पुणे, ता. २५ : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने देशात हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने रविवारी (ता. २८) पुण्यात हिंदू एकता दिंडीचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे चैतन्य तागडे यांनी दिली.
या प्रसंगी संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, समविचारी संघटना रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर उपस्थित होत्या. या वेळी तागडे म्‍हणाले, ‘‘डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हा ब्रह्मोत्सव म्हणून साजरा होत असताना याची सुरवात रामनवमीपासून करण्यात आली. यामध्ये समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या तीन सूत्रांतर्गत मंदिर स्‍वच्छता अभियान, हिंदू राष्ट्रासाठी मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना, प्रवचन तसेच विविध उपक्रम होत आहेत. त्याच अनुषंगाने होत असलेल्या हिंदू एकता दिंडी पायी निघणार असून याची सुरवात २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता भिकारदास मारुती मंदिर चौक-बाजीराव रस्ता येथील महाराणा प्रताप उद्यान येथून होणार आहे. तसेच बाजीराव रस्ता मार्गे लक्ष्मी रस्ता-टिळक चौक-स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, डेक्कन असा दिंडीचा मार्ग असेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com