पुणे जिल्ह्यात ९१.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात ९१.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे जिल्ह्यात ९१.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे जिल्ह्यात ९१.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातून बारावीची परीक्षा दोन लाख ४० हजार ६९२ नियमित विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील दोन लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी (९३.३४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागीय मंडळात सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के सर्वाधिक असून पुणे जिल्ह्यातील ९१.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभागीय मंडळातून तब्बल दोन लाख ४२ हजार ७३४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार ६९५ असून त्यापैकी सहा हजार ६५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील तीन हजार ८६ विद्यार्थी (४६.३९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. नियमित आणि पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण विद्यार्थी ९२.०७ टक्के आहेत. ३१ विषयांचा निकाल १०० टक्के इतका आहे.

मंडळानुसार निकाल
जिल्हा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : १,३०,८८५ : १,१९,२९७ : ९१.१४ टक्के
नगर : ६२,७३९ : ५८,१२० : ९२.६३ टक्के
सोलापूर : ५३,७१९ : ५०,३३४ : ९३.६९ टक्के

पुणे शहरातील निकाल
भाग : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे शहर (पश्चिम भाग) : २८,१०१ : २४,९११ : ८८.६४ टक्के
पुणे शहर (पूर्व भाग) : २४,२५१ : २१,४०१ : ८८.२४ टक्के

एकूण शाखानिहाय निकाल
शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : ९६.८७ टक्के
कला : ८६.१४ टक्के
वाणिज्य : ९२.८१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ९२.९५ टक्के
टेक-सायन्स : ९३.०२ टक्के