राज्यात ३२.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यात ३२.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे, ता. २८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांमधील एकूण ७० हजार २०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील ३२.१३ टक्के म्हणजेच २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुरवणी परीक्षा ४३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी दिली, त्यातील १२ हजार ८५० विद्यार्थी (२९.५६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यातील २५ हजार ४४९ विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली असून त्यातील नऊ हजार २९४ विद्यार्थिनी (३६.५२ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत.

विभागीय मंडळनिहाय टक्केवारी
विभागीय मंडळ : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : निकालाची टक्केवारी
पुणे : ११,४५२ : ३,३६३ : २९.३६
नागपूर : ६,६९० : २,५१८ : ३७.६३
औरंगाबाद : ४,७२६ : २,३४६ : ४९,६४
मुंबई : २८,८६६ : ७,१६५ : २४.८२
कोल्हापूर : ४,५६३ : १,३७६ : ३०.१५
अमरावती : २,४७३ : ७९२ : ३२.०२
नाशिक : ५,४३६ : २,००१ : ३६.८१
लातूर : ४,१४८ : २,४२९ : ५८.५५
कोकण : ५५५ : १५४ : २७.७४
एकूण : ६८,९०९ : २२,१४४ : ३२.१३

उत्तीर्णतेची तुलनात्मक माहिती
तपशील : सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ : जुलै-ऑगस्ट २०२२ : जुलै-ऑगस्ट २०२३
एकूण : २५.८७ टक्के : ३२.२७ टक्के : ३२.१३ टक्के

शाखानिहाय निकाल
शाखा : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या : उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : १४,६३२ : ५५.२३
कला : ४,१४६ : २०.५९
वाणिज्य : ३,०२८ : १४.६८
व्यवसाय अभ्यासक्रम : २८६ : १७.८६
आयटीआय : ५२ : ८१.२५

पुणे विभागीय मंडळाचा निकाल
जिल्हे : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : ८,२०३ : ८,०३० : २,०९८ : २६.१२
नगर : २,२०७ : २,१८० : ७३३ : ३३.६२
सोलापूर : १,२७१ : १,२४२ : ५३२ : ४२.८३

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com