दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर २०२३
दहावीच्या पुरवणी परीक्षेत २९.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे, ता. २८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत १३ हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी २९.८६ टक्के इतकी आहे. या परीक्षेसाठी ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १७ हजार ३९९ एवढी आहे. ते शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
......
विभागीय मंडळनिहाय निकाल
विभागीय मंडळ : उत्तीर्ण विद्यार्थी : टक्केवारी
पुणे : १,६२३ : २२.२२
नागपूर : १,७३७ : ४१.९०
औरंगाबाद : १,८९८ : ३७.२५
मुंबई : २,२४३ : १५.७५
कोल्हापूर : ७१२ : २९.१८
अमरावती : १,०९६ : ४३.३७
नाशिक : २,५६५ : ४१.९०
लातूर : १,५२० : ५१.४७
कोकण : ९३ : २७.०३
एकूण : १३,४८७ : २९.८६
.............
वर्षनिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी
वर्ष : २०२१ : २०२२ : २०२३
संपूर्ण राज्य : २९.१४ : ३०.४७ : २९.८६
.............
निकालाची आकडेवारी
तपशील : मुले : मुली : एकूण
नोंदणी झालेले : ३३,४८० : १५,८९७ : ४९,३७७
परीक्षा दिलेले : ३१,४७८ : १३,६८८ : ४५,१६६
उत्तीर्ण झालेले : ८,६०२ : ४,८८५ : १३,४८७
उत्तीर्णतेची टक्केवारी : २७.३२ : ३५.६८ : २९.८६
......
पुणे विभागीय मंडळाची आकडेवारी
जिल्हे : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
पुणे : ४,४९८ : ४,२१० : ७२६ : १७.२४
नगर : २,२५१ : २,१३८ : ६४२ : ३०.०२
सोलापूर : १,०१३ : ९५३ : २५५ : २६.७५
एकूण : ७,७६२ : ७,३०१ : १,६२३ : २२.२२
-----