पुणे
डॉ. काळकर यांच्याकडे प्र-कुलगुरू म्हणून पदभार
पुणे, ता. २८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू म्हणून डॉ. पराग चंद्रकांत काळकर यांनी विद्यापीठ आवारातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून पदभार स्वीकारला. या वेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिसभा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शनिवारी त्यांची नियुक्ती निश्चित झाली.