
तंत्रनिकेतन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
पुणे, ता. २७ ः भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय आंतर तंत्रनिकेतन वक्तृत्व स्पर्धेत ३६ तंत्रनिकेतनमधील ६१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला
या स्पर्धेत भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचा विद्यार्थी अवधूत नुलाने प्रथम क्रमांकाचे व मृदुल शहाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसची विद्यार्थिनी आरती काशीद ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. याशिवाय ध्येयजा पेटकर, अभिषेक कोळी, यश साखरवडे आणि वैभव होके यांना उत्तेजनार्थ बक्षीसे दिली.
अभिनेते संजीव मेहेंदळे यांनी अध्यक्षपद भूषविले. परीक्षक म्हणून अभिनेते मंगेश दिवाणजी व अभिनेत्री डॉ. प्रचिती सुरू-कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्राचार्य राजेंद्र उत्तुरकर यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे संयोजक प्रा. महारुद्र कापसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन तेजस्विनी शिंदे व अनिकेत पवार यांनी केले.