‘पर्णकुटी’तर्फे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पर्णकुटी’तर्फे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे
‘पर्णकुटी’तर्फे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे

‘पर्णकुटी’तर्फे महिलांना स्वयंरोजगाराचे धडे

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः शहर परीसरातील महिला व वंचित समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने ‘धारा’ प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना शिवणकाम, बेकरी उत्पादने, कुकिंग व केटरिंग, ब्युटी पार्लर, मसाले तयार करणे, कापडी पिशव्या बनविणे, व्यवसाय व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आदींचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी पर्णकुटी संस्थेच्या सह-संस्थापिका स्नेहा भारती, कोंगा कंपनीच्या स्नेहल काळे, गजानन पुजारी, पीडब्ल्यूसी इंडिया फाउंडेशनचे दीपक महुरकर, गीतांजली सेन, हेक्सावेअरचे पंकज वाघमारे, एआरसी फोरमच्या पौर्णिमा गादिया, निवृत्त सनदी अधिकारी विनोद कुमार आदी उपस्थित होते. संस्थेतर्फे दोन महिला व एक वंचित घटकातील व्यावसायिक यांना त्यांच्या व्यवसायासाठी बीज भांडवल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन नेहा ठाकूर व पूनम लोंढे यांनी, तर स्नेहा भारती यांनी आभार मानले.