गायन-नृत्याच्या मिलाफाने अभिषेकी महोत्सवाचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायन-नृत्याच्या मिलाफाने 
अभिषेकी महोत्सवाचा समारोप
गायन-नृत्याच्या मिलाफाने अभिषेकी महोत्सवाचा समारोप

गायन-नृत्याच्या मिलाफाने अभिषेकी महोत्सवाचा समारोप

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या बहारदार नृत्याची पेशकश आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या बहुविध रचनांचे त्यांचे पुत्र व शिष्य शौनक अभिषेकी व गायिका विदुषी देवकी पंडित यांनी केलेले सादरीकरण, अशा नृत्य आणि गायनाच्या मिलाफाने १६ व्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचा समारोप झाला.

आपला परिसर, तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाच्या समारोप सत्रात प्रारंभी शर्वरी जमेनीस यांनी शिष्यांसह दुर्गा वंदना, तीन तालात उठाण, थाट, आमद, परन आणि तिहाई आदींचे सादरीकरण केले. महोत्सवाची सांगता शौनक अभिषेकी आणि देवकी पंडित यांच्या ‘श्यामरंग’ या कार्यक्रमाने झाली. यामध्ये पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या शास्त्रीय, भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यसंगीतांमधील अजरामर रचना सादर केल्या. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव यांनी आणि सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर साथसंगत केली. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन शैला मुकुंद यांचे होते. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात स्वर शर्मा, सिद्धार्थ मेस्ता आणि आदित्य खांडवे या युवा कलाकारांचे सादरीकरण झाले. संपूर्ण महोत्सवाचे निवेदन रवींद्र खरे आणि रश्मी अभिषेकी यांनी केले.