केदार जाधव यांचे 
बेपत्ता वडील सापडले

केदार जाधव यांचे बेपत्ता वडील सापडले

पुणे/घोरपडी, ता. २७ : भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांचे वडील सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. परंतु रात्री उशिरा ते घोरपडी येथील जयहिंद चौकात आढळून आले. त्यामुळे जाधव कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
केदार जाधव हे त्यांच्या कुटुंबीयांसह कोथरूड परिसरात राहतात. त्यांचे वडील महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशचा (डिमेन्शिया) आजार आहे. त्यामुळे त्यांना काही बाबी आठवत नाहीत. ते सोमवारी (ता. २७) दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले होते. तेथे काही वेळ पायी फिरल्यानंतर ते बाहेर पडले. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे केदार जाधव यांनी अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.
पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट केले होते. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. दरम्यान, एका घोरपडी गावातील आरती दाभाडे या महिलेला रात्री दहाच्या सुमारास एक व्यक्ती जयहिंद चौकात एकटीच बसल्याचे दिसून आले. या महिलेने पोलिस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर फोन केला. त्यानंतर बीट मार्शल प्रवीण होळकर आणि संतोष पाटमस हे घटनास्थळी पोचले. त्यांनी केदार यांच्याशी संपर्क साधून वडील सापडल्याची गोड बातमी दिली.

वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. तसेच, सर्व मित्रपरिवारानेही सहकार्य केले. ईश्वराचे आशीर्वाद आणि सर्वांच्या सदिच्छेमुळे वडील सापडले. सर्वांचे मनापासून आभार.
- केदार जाधव, भारतीय क्रिकेटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com