
‘पीएनजी ज्वेलर्स’ची माधुरी ब्रँड अॅम्बेसिडर
पुणे, ता. २९ ः देशातील आघाडीचा ज्वेलरी ब्रॅंड ‘पीएनजी ज्वेलर्स’ने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला पुढील दोन वर्षांसाठी ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून निवड केल्याची घोषणा केली आहे. माधुरी आता जागतिक स्तरावर आणि देशभर या ब्रँडचे प्रतिनिधित्व करेल. माधुरी यापूर्वी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडच्या ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ होती.
दोन शतकांपासून ‘पीएनजी ज्वेलर्स’ उत्कृष्ट दागिन्यांची निर्मिती करत असून भारत, अमेरिका आणि यूएईमध्ये या ब्रँडची ३६ दालने आहेत. नववधूंचे दागिने, सोन्याचे दागिने, नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांच्या कलेक्शनची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध असते.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘‘माधुरी दीक्षित ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या ब्रँड अॅम्बेसिडर झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. माधुरीचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून आमचे ग्राहकही आहेत. त्यांची मूल्ये आमच्या ब्रँडशी सुसंगत आहेत. त्यामुळे आमच्या ब्रँडची प्रतिमा व भारतीय आणि जागतिक स्तरावरील अलंकार बाजारपेठेत आमचे स्थान अधिक मजबूत करण्यास मदत करेल.‘पीएनजी ज्वेलर्स’ पुढील आर्थिक वर्षात आणखी किमान पाच दालने सुरू करणार आहे.’’
माधुरी दीक्षित म्हणाल्या, ‘‘कलाकुसर, परंपरा आणि अभिजातता यांच्याशी सुसंगत असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडसोबत जोडल्याचा मला अभिमान आहे. मला नेहमीच ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या अप्रतिम अशा दागिन्यांच्या कलेक्शनचे आकर्षण राहिले आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या पुढील प्रवासातील एक भाग होण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या जगभरातील ग्राहकांसोबत कनेक्ट होण्यासाठी मी सज्ज आहे.’’