महावीर जोंधळे यांच्या अमृत महोत्सवी सत्काराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर जोंधळे यांच्या अमृत महोत्सवी सत्काराचे आयोजन
महावीर जोंधळे यांच्या अमृत महोत्सवी सत्काराचे आयोजन

महावीर जोंधळे यांच्या अमृत महोत्सवी सत्काराचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन येत्या रविवारी (ता. २ एप्रिल) विदिशा विचार मंचातर्फे केले आहे, अशी माहिती मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी पत्रकाव्दारे दिली.
ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. जोंधळे यांच्या जीवन, कार्य आणि लेखन प्रवासात त्यांना सोबत करणाऱ्या त्यांच्या पत्नी इंदुमती जोंधळे यांचाही यावेळी सत्कार होणार आहे. २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होईल, असे क्षेमकल्याणी यांनी कळविले आहे.