पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या 
प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर

पुणे, ता. २८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. आता विद्यापीठाने पीएच.डी. अभ्यासक्रमाची दुसरी प्रवेश फेरी जाहीर केली आहे. या दुसऱ्या फेरीत पहिल्या फेरीतील मुलाखतीमध्ये अपात्र ठरलेले, अनुपस्थित राहिलेले पात्र विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या(२०२२) पहिल्या फेरीतील भरलेल्या जागा विचारात घेऊन उर्वरित रिक्त जागा भरण्यासाठी तसेच नव्याने मिळालेल्या मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शकांना व पदोन्नतीने प्रवेशासाठी वाढलेल्या अधिकच्या जागा भरण्यासाठी दुसऱ्या प्रवेश फेरीचे आयोजन केले आहे. विद्यापीठ विभाग अथवा संशोधन केंद्रामध्ये ‘पीएच.डी’च्या दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संशोधक मार्गदर्शकांना जागा अद्ययावत करण्यासाठी आता विद्यापीठाने ४ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. तर मार्गदर्शकांनी अद्ययावत केलेल्या जागा संशोधक केंद्रांनी आरक्षणनिहाय निश्चित करण्यासाठी ५ ते १० एप्रिलचा कालावधी दिला आहे.
प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी संशोधन केंद्र बदलणार नाहीत, तसेच प्रथम फेरीसाठी असलेले संशोधन केंद्र दुसऱ्या फेरीसाठी कायम राहतील. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिक्त जागांच्या उपलब्धतेबाबतची खातरजमा करावी. दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकास यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

प्रवेश प्रक्रिया द्वितीय फेरी

तपशील : कालावधी
- संशोधक मार्गदर्शकांनी जागा अद्ययावत करणे : ४ एप्रिलपर्यंत
- मार्गदर्शकांनी अद्ययावत केलेल्या जागा संशोधन केंद्रांनी आरक्षणनिहाय निश्चित करणे : ५ ते १० एप्रिल
- विद्यार्थ्यांनी आरक्षणनिहाय उपलब्ध रिक्त जागा विचारात घेऊन संशोधन केंद्र निवडणे/बदलणे : ११ ते २० एप्रिल
- विद्यापीठाकडून संशोधन केंद्रांना विद्यार्थ्यांनी निवडलेल्यानुसार याद्या पाठविणे : २१ ते २२ एप्रिल
- संशोधन केंद्रांनी मुलाखतींचे आयोजन करून मुलाखत प्रक्रिया पूर्ण करणे : २३ एप्रिल ते १५ मे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com