विदर्भात पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भात पावसाची शक्यता
विदर्भात पावसाची शक्यता

विदर्भात पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः कमाल तापमानात होणारी वाढीमुळे जाणवणारे उन्हाचे चटक्यांची स्थिती सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, यातच विदर्भात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी (ता. २९) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद बह्मपुरी येथे ३९.२ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान पुण्यात १४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. कोकण वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान कायम आहे. सध्या मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच पूर्व बिहार ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत दुसरा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यात नैर्ऋत्य राजस्थान व लगतच्या परिसरावर सक्रिय असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसासाठी अनुकूल वातावरण होत आहे. परिणामी गुरुवारपासून (ता. ३०) विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.

शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा झालेली घट अद्याप कायम आहे. त्यामुळे काहीसा गारठ्याची अनुभूती पुणेकरांना होत आहे. मंगळवारी शहरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ अंशांनी घट कायम होती. तर कमाल तापमान हे ३५ अंशांच्या घरात होते. दरम्यान पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने किमान तापमानाचा पारा पुन्हा चढू लागेल. त्यानंतर मात्र निरभ्र वातावरणाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.