मुख्यमंत्री व इतर प्रतिक्रिया

मुख्यमंत्री व इतर प्रतिक्रिया

खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, कणखर आणि मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. तसेच, भाजपचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात भाजप वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. विरोधकांनाही आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरू शकणार नाही. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com