Sun, June 4, 2023

रोटरी यूथ एक्स्चेंज उपक्रम रविवारी
रोटरी यूथ एक्स्चेंज उपक्रम रविवारी
Published on : 29 March 2023, 1:53 am
पुणे, ता. २९ : विविध देशांतील सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘रोटरी यूथ एक्स्चेंज’ उपक्रमाची सुरुवात येत्या रविवारी (ता. २ ) पिंपरी कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार आहे. कार्यक्रमात माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, रोटरी युथ एक्स्चेंजचे संचालक दीपक बोधनी आदी मार्गदर्शन करतील, अशी माहिती रो. अंकुश पारख यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली. बोधनी आणि सारिका रोटे या वेळी उपस्थित होत्या. ‘रोटरी युथ एक्स्चेंज’ कार्यक्रम युवकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. हा कार्यक्रम १५ ते १९ वयोगटातील मुला-मुलींसाठी खुला आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.rye3131.org या संकेतस्थळावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केली आहे.