Wed, June 7, 2023

सांगीतिक सोहळ्याचे आयोजन
सांगीतिक सोहळ्याचे आयोजन
Published on : 29 March 2023, 1:34 am
पुणे, ता. २९ : तालयोगी आश्रमाची तपपूर्ती आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. ४) सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सांगीतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते तालयोगी आश्रमाच्या वेबसाइटचे उद्घाटन होणार आहे. सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन होणार असून, त्यांना तन्मय देवचक्के संवादिनी साथ करणार आहेत. त्यानंतर पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होणार असून, त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर तबल्यावर तर मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर साथ करणार आहेत. या सोहळ्यास सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती आश्रमाचे मंदार जोशी आणि श्रीनिवास केंदळे यांनी दिली.