हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत ‘पहचान के नए पंख’ प्रथम

हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत ‘पहचान के नए पंख’ प्रथम

पुणे, ता. २९ ः राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नवी मुंबईतील शिवरंगभूमी प्रशांत प्रतिष्ठान संस्थेच्या ‘पहचान के नए पंख’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे निकालाची घोषणा केली.
या स्पर्धेत वाशीच्या मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ संस्थेच्या ‘चुभन’ या नाटकाने द्वितीय तर पुण्याच्या स्वतंत्र कला ग्रुप संस्थेच्या ‘सिंहर उठी थी मौत यहाँ’ या नाटकाने तृतीय पारितोषिक पटकावले. परभणीच्या राजीव गांधी युवा फोरम संस्थेच्या ‘दानव’ या नाटकाला चौथ्या क्रमांकाचे आणि नागपूरच्या अंभृणी सेवा संस्थेच्या ‘भोर की मृत्यू’ या नाटकाला पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. २३ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पुण्यातील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, मुंबईतील दामोदर नाट्यगृह आणि नागपूरमधील सायंटिफिक सभागृहात ही स्पर्धा झाली. यात ५४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी दीप चहांदे, प्रकाश वाडकर आणि नितीन गरुड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
दिग्दर्शनासाठी प्रशांत निगडे, अभिजित चौधरी व अशोक पालवे आणि लेखनासाठी राहुल गावंडे, वासंती भगत व पराग घोंगे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. प्रकाश योजनेसाठी श्याम चव्हाण, वाल्मीक जाधव व नयन त्यारे, नेपथ्यसाठी अरुण जगताप, संदेश बेंद्रे व निरंजन घरत आणि रंगभूषेसाठी आयुषी आनंद, तस्वी घाडी व लालजी श्रीवास यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक जाहीर झाले.

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः
प्रेम गौडा, प्रशांत निगडे, अशोक पालवे, आदित्य बुलकुंदे, अतुल साळवे, धनश्री हेबळीकर, विरीशा नाईक, मेघना केळकर, कल्याणी गोखले, मृदुला अय्यर.

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः
स्नेहल राऊत, दीपलक्ष्मी भट, अस्मिता पाटील, निर्वाणी चौधरी, रंजना म्हाबदी, अर्चना शर्मा, प्रियांका धुमाळ, रुचिका तांबे, श्रेयस अतकर, लव शर्मा, गणेश राणे, पुष्पक भट, अरविंद माने, बिस्मार्क भिवगडे, चेतन लोयर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com