उन्हाचा चटका पुण्यात कायम राहणार

उन्हाचा चटका पुण्यात कायम राहणार

पुणे, ता. २९ ः शहरात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून, सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविले जात आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना पुणेकर करत आहेत.
आठवडाभरापासून शहरातील उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बुधवारी शहरातील सरासरी कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. लोहगावात उन्हाचा कडाका उर्वरित शहरापेक्षा जास्त होता म्हणूनच तेथील सरासरी कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवार (ता. १) पर्यंत शहरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील, तसेच उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

विदर्भात पावसाचा इशारा...
उत्तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगण, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा असून, राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com