क्षण बहराचे
सहृदय मित्र जमविणारी पुस्तक भिशी

क्षण बहराचे सहृदय मित्र जमविणारी पुस्तक भिशी

पुण्यातील त्या पुस्तक भिशीचे सभासद असलेली दहा-बारा कुटुंबे मिळून पुस्तकांचा आनंद घेतात. पती-पत्नी व मुले महिना-दीड महिन्याने यासाठी एकत्र जमतात. या वेळी ‘‘वाचलेल्या पुस्तकांबाबत चर्चा, कवितावाचन व गावातील साहित्यविषयक कार्यक्रमांच्या माहितीची देवाणघेवाण आम्ही करतो,’’ अशी माहिती सभासद नितीन क्षीरसागर यांनी दिली.

क्षीरसागर म्हणाले, ‘‘सुमारे वीस वर्षांपूर्वी सतीश खाडे व प्रा. पीयूष पहाडे यांनी दहा-बारा कुटुंबांना एकत्र जोडणारी पुस्तक भिशी सुरू केली. यात काहीजण नंतर बाहेर पडले, पण तेवढेच नवे जोडले गेले. महिना-दीड महिन्याने आम्ही सगळे जमतो. दरडोई शंभर रुपये जमवून ती रक्कम आळीपाळीने एकाला दिली जाते. जमलेल्या पैशांमधून संबंधिताने आवडीच्या विषयांवरील पुस्तके खरेदी करणे, ती सभासद कुटुंबांमध्ये फिरविणे, वाचलेल्या पुस्तकांवर भिशीच्या वेळी चर्चा, कविता सादर करणे, त्या सुमारास गावात झालेल्या किंवा होऊ घातलेल्या साहित्यविषयक कार्यक्रमांच्या माहितीची देवाणघेवाण वगैरे यामध्ये जमलेले सगळेच भाग घेतात. यात नव्या पिढीला सहभागी होण्यासाठी आवर्जून प्रोत्साहन दिले जाते.’’

क्षीरसागर यांनी सांगितले की, साहित्यविषयक गप्पांच्या माध्यमातून सहृदय मित्र जमविणे हा हेतू यामागे आहे. महिन्यातून आठ-नऊ वेळा तरी भेट घडते. शंभरावी भेट साजरी करण्यासाठी जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. वाचनप्रेमाचे लोण इतरांमध्येही पसरावे, या उद्देशाने त्यात सभासदांनी मनोगत व्यक्त करत वेचक आणि वेधक पुस्तकांची माहिती दिली होती. या समूहात सर्व क्षेत्रांतील व्यक्ती आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या विषयातील प्रकाशित साहित्याची ओळख, त्यांच्या बोलण्यातून दुसऱ्यांना होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com