दिव्यांग प्रवाशांच्या पासचे ३० एप्रिलपर्यंत नूतनीकरण

दिव्यांग प्रवाशांच्या पासचे ३० एप्रिलपर्यंत नूतनीकरण

पुणे, ता. ३० ः पुणे महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत बस सेवेसाठी दिलेल्या पासची मुदत शुक्रवारी (ता. ३१) संपत आहे. त्यांनी १ ते ३० एप्रिलदरम्यान पासचे नूतनीकरण करावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
दिव्यांग तसेच विशेष बाब म्हणून स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रपती पदक विजेते, राष्ट्रीय खेळाडूंना पास दिले आहेत. त्यांच्या पासची मुदत शुक्रवारी संपत असल्याने पीएमपी मुख्यालयाशेजारील पास विभागातून पासचे नूतनीकरण करून घ्यावे. सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी १.३० व दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत हे काम केले जाईल. पास नूतनीकरण करताना जुना पास, आधार कार्डचे झेरॉक्स, दोन आयकार्ड साईज रंगीत फोटो जमा करणे बंधनकारक आहे. पासचे नूतनीकरण करताना जुने पास प्रवासासाठी ग्राह्य धरला जाईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com