
‘आरसीसी-सेट’ परीक्षेचे आयोजन
पुणे, ता. ३० : प्रा. शिवराज मोटेगावकर संचलित आरसीसी शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावीतून अकरावीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी येत्या रविवारी (ता. २) ‘आरसीसी’च्या सर्व शाखांमध्ये ‘आरसीसी-सेट’ ही
स्कॉलरशिप ऑफलाइन परीक्षा आयोजित केली आहे. डॉक्टर, इंजिनिअर होण्याचा मानस असलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन ‘आरसीसी’तर्फे करण्यात आले आहे.
प्रा. मोटेगावकर संचलित रेणुकाई करिअर सेंटरतर्फे ‘आरसीसी सेट’ या स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही परीक्षा आरसीसीच्या लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-पुणे, अकोला या सर्व शाखांमधील केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘www.rccpattern.com’ या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या धर्तीवर होणार आहे. याशिवाय अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आरसीसीतर्फे करण्यात आले आहे.