Tue, June 6, 2023

डॉ. बिमल पटेल यांचे उद्या व्याख्यान
डॉ. बिमल पटेल यांचे उद्या व्याख्यान
Published on : 30 March 2023, 4:33 am
पुणे, ता. ः शहरीकरणाचे अभ्यासक डॉ. बिमल पटेल यांचे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत शनिवारी (ता. १) व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित हे व्याख्यान सकाळी ११ वाजता पार पडेल. शहरीकरणाच्या पुनर्विकासावर पटेल आपले विचार मांडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अबय पेठे असणार आहे. देशातील वाढते शहरीकरण आणि सुविधांच्या व्यवस्थापनासंबंधीचा आढावा या माध्यमातून घेण्यात येणार आहे.