Sun, June 4, 2023

अल्पसंख्याक संघटनांकडून बापटांना श्रद्धांजली
अल्पसंख्याक संघटनांकडून बापटांना श्रद्धांजली
Published on : 30 March 2023, 4:41 am
पुणे, ता. ३० : खासदार गिरीश बापट यांनी मुस्लिमधर्मीय नागरिकांबद्दल कायम आदराची भावना ठेवत त्यांच्यासाठी भरीव काम केले. त्यांच्यासारख्या जनसामान्यांच्या नेत्याच्या जाण्याने पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुस्लिम नागरिकांनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय अल्पसंख्याक संघटना, आझम कॅम्पस, पूना कॉलेज, मुस्लिम राष्ट्रीय मंच, मुस्लिम ओबीसी संघटना, राष्ट्रीय एकात्मता संघटना या संघटनांसह डॉ. पी. ए. इनामदार, ताहेर असी, डॉ. अल्ताफ शेख आदींनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.