Sun, June 4, 2023

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Published on : 30 March 2023, 4:51 am
पुणे, ता. ३० : एका १६ वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुंढवा पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत घडला.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युवराज चौगुले (वय २०, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज चौगुले याने मुलीसोबत मैत्री करून संबंध प्रस्थापित केले. मैत्रीबाबत आई-वडिलांना सांगून तुझा काटा काढेल, अशी धमकी देऊन आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.