सिलिंडरमध्ये बेकायदा
रिफिलिंग करणारे ताब्यात

सिलिंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करणारे ताब्यात

पुणे, ता. ३१ : सिंहगड रस्ता भागात घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तुकाईनगर परिसर आणि वडगाव बुद्रुक येथे गॅस रिफिलिंग स्टेशनचा कोणताही परवाना न बाळगता बेकायदा विक्री करण्यात येत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी काहीजण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून रिफिलिंग पाइपचा वापर करून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून एचपी गॅस, भारत पेट्रोलियम कंपनीचे घरगुती आणि व्यावसायिक वापराचे ११४ गॅस सिलिंडर, तीन टेंपोसह १७ लाख २२ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com