डी. वाय. पाटील विद्यापीठात
 राष्ट्रीय डिझाईन परिषद

डी. वाय. पाटील विद्यापीठात राष्ट्रीय डिझाईन परिषद

पुणे, ता. ३१ : ‘‘डिझाईन क्षेत्रातील नव्या संधी, तंत्रज्ञान आणि बदलते प्रवाह विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत. विद्यार्थ्यांनी आपण निवडलेल्या करिअरमध्ये आत्मविश्वासाने प्रयत्नशील असावे,’’ असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले.

ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईनतर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय डिझाईन परिषदेचे उद्‌घाटन डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. स्मिता जाधव, वक्ते सय्यद असद अब्बास, डिझाईन तज्ज्ञ रिखील नागपाल, स्कूल ऑफ डिझाईनचे संचालक डॉ. कुमार वेंकटरामन, सल्लागार अमित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेत आर्ट ऑफ नेटवर्किंग, व्यंग्यचित्रांतून तणावमुक्ती, मॉड्युलर किचन डिझाईन, ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग आणि कॉमिक्स, डिजिटल मीडिया क्षेत्रातील करिअरच्या संधी, अशा विषयावर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नागपाल म्हणाले, ‘‘डिझाईन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. रोजगार आणि उद्योग दोन्ही प्रकारे तुम्हाला यामध्ये योगदान देता येईल. त्यासाठी या क्षेत्रातील नवे प्रवाह, तंत्रज्ञान आत्मसात करावे. कल्पकता, नावीन्यता आपल्या डिझाईनमध्ये असायला हवी, हे लक्षात ठेवावे.’’ सय्यद असद अब्बास म्हणाले,‘‘आपण करत असलेल्या कामाविषयी आपल्याला मांडणी करता यायला हवी. त्याचे मार्केटिंग उत्तम करता यायला हवे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com