डॉ. आंबेडकर अध्यासनाची
‘सिंबायोसिस’मध्ये स्थापना

डॉ. आंबेडकर अध्यासनाची ‘सिंबायोसिस’मध्ये स्थापना

पुणे, ता. ३१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्यातर्फे सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात देशातील २५ व्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासना’ची स्थापना करण्यात आली. या अध्यासनासाठी वार्षिक ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत डॉ. आंबेडकरांचे सर्वसमावेशकतेवरील विचार आणि योजनेच्या इतर उद्दिष्टांवर अभ्यास करण्यात येणार आहे.

विद्यापीठात या अध्यासनासाठी सामंजस्य करार शुक्रवारी करण्यात आला. या वेळी ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, फाउंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी, ‘सिंबायोसिस’च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

त्रिवेदी म्हणाले, ‘‘भारतीय समाजातील वंचित घटकांच्या वर्तमान आणि भूतकाळातील समस्यांवर अत्याधुनिक सामाजिक संशोधन आणि अध्यापनासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. समाजातील वंचितांना न्याय देणे आणि त्यांना सक्षम करणे हे फाउंडेशनचे ध्येय आहे.’’ डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘‘या करारामुळे विद्यार्थी, प्राध्यापकांना नव्या संधी मिळू शकणार आहेत. हा करार समाजातील दुर्बल घटकांच्या समकालीन समस्या आणि त्या समस्यांवरील उपाययोजनांच्या दृष्टीने संशोधन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.’’ विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com