निर्णयाचे क्रेडाई पुणे मेट्रोकडून स्वागत

निर्णयाचे क्रेडाई पुणे मेट्रोकडून स्वागत

पुणे, ता. ३१ ः मुद्रांक शुल्क आणि रेडीरेकनर दरात कोणतेही बदल न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. यामुळे ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, ‘‘रेडीरेकनर दरांचे तर्कसंगत पुर्नमूल्यांकन व्हावे आणि मुद्रांक शुल्काचे दर वाढवू नयेत, यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्या शिष्टमंडळाने राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुद्रांक शुल्क नोंदणी विभागातील उच्च अधिकारी यांची सातत्याने भेट घेऊन याबाबत शिफारस केली होती. आमच्या विनंतीची सकारात्मक दखल घेत राज्य सरकारने आज जो निर्णय जाहीर केला आहे, त्याबाबत आम्ही आभारी आहोत.’’
रेपो दरात होणाऱ्या वाढीमुळे घरखरेदीदार हे आधीच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे आज घेण्यात आलेल्या या निर्णयाने त्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. याचा फायदा घर खरेदीदारांना होईल, असे सांगत नाईकनवरे म्हणाले, ‘‘गृहकर्जाचे व्याजदर हे नेहमीच बदलत राहतात, त्यामुळे रेपो दरातील वाढ ही अधिक प्रभावी असली, तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असते. मात्र मुद्रांक शुल्क आणि रेडीरेकनर दर ग्राहकांची खरेदी क्षमता आणि बांधकाम खर्च यावर थेट प्रभाव करत असल्याने त्यांचा परिणाम हा कायमस्वरूपी असतो. आज जाहीर झालेल्या या निर्णयाचा बांधकाम उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com