
भारती विद्यापीठात ‘भारतीयम २०२३’
पुणे, ता. ३१ ः कल्पनाशक्ती, निरीक्षणक्षमता याद्वारे लोकांची गरज ओळखून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा नवीन उद्योग निर्मितीवर भर द्यावा, असे मत पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय गांधी यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘भारतीयम २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ॲकॅडमिक इंटरफेस प्रोग्रॅम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे विभाग प्रमुख ऋषीकेष धांडे, इंडो युरोचे सीईओ नरेंद्र मोहपत्रा, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी. जयकुमार, प्राचार्या डॉ. विदुला सोहोनी, उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण, उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद जाधव उपस्थित होते. समन्वयक म्हणून डॉ. सुधीर जाधव, प्रा. गजानन भोळे यांनी जबाबदारी पार पाडली. प्रास्ताविक डॉ. सचिन चव्हाण यांनी केले तर डॉ. प्रमोद जाधव यांनी आभार मानले.