‘पीएमआरडीए’चे आयुक्त पीएमपीचे संचालक

‘पीएमआरडीए’चे आयुक्त पीएमपीचे संचालक

पुणे, ता. ३१ ः पीएमपीच्या संचालक मंडळावर आता पीएमआरडीए आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे आता पीएमपीच्या संचालक मंडळामध्ये १४ संचालक असतील. ‘पीएमपीएमएल’ची २००७ साली मध्ये स्थापना झाली. त्यावेळी संचालक मंडळावर १३ संचालक होते. १६ वर्षांनंतर पीएमपीच्या संचालकांत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे नवीन एक संचालकपद निर्माण करण्यात आले. पीएमपी पीएमआरडीएच्या भागात रोज ४४७ बसच्या माध्यमातून प्रवासी सेवा देते. मात्र तिथे प्रवाशांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने पीएमपीची सेवा तोट्यात आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांना पीएमपीचे संचालक करण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीच्या एकूण वार्षिक तूट पैकी सुमारे १८६ कोटी ‘पीएमआरडीए’कडून पीएमपी घेणार आहे. याकरिता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून पीएमआरडीएच्या आयुक्तांची पीएमपी संचालक मंडळावर नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com