महापालिकेकडून ‘स्वच्छोत्सव’ साजरा

महापालिकेकडून ‘स्वच्छोत्सव’ साजरा

पुणे, ता. १ : प्रदर्शन, महिला आरोग्य निरीक्षकांचा सन्मान, पर्यावरण जनजागृती, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे महापालिकेने जागतिक शून्य कचरा दिन आयोजित करून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली. या उपक्रमामध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी भरविल्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या हस्ते झाले. याप्रंसगी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत, नितीन उदास, जयंत भोसेकर, संदीप कदम, अविनाश सपकाळ उपस्थित होते.
या प्रदर्शनात महिला बचत गटांद्वारे बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक वस्तू ठेवल्या होत्या. या वेळी डॉ. वृषाली रणधीर, लता हिरेमठ, ज्योती भालेराव, रूपाली शेंडगे, निलीमा काकडे, मैथिली मनकवाड, नंदा प्रताप, निर्मला थोरमोटे, राजेश गायकवाड, श्‍यामला देसाई, रूपाली मगर, दिलीप मेहता यांचा सन्मान करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे केंब्रिज पब्लिक स्कूल, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन्सच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती करणारे नृत्य, पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याबरोबरच स्वच्छता रॅलीचेही आयोजन केले होते. याबाबत खेमनार म्हणाले, ‘‘आपले शहर नेहमीच स्वच्छ व सुंदर ठेवण्यात नागरिकांचे मोलाचे योगदान असते. त्यामुळेच महापालिका विविध प्रकारचे उपक्रम यशस्वी होतात. स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ मध्येही शहरास उच्च स्थान मिळावे, यासाठीही नागरीकांनी सहकार्य करावे.’’
34114

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com