स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कार्यक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कार्यक्रमाचे आयोजन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कार्यक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, ता. १ : भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित कविता व गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लक्ष्य कला मंच, नटरंग अकॅडमी, प्रियदर्शनी अकॅडमी, श्रीमंथ इंटरटेन्मेंट प्रा. लि. यांचे सहकार्य लाभले आहे. रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी केले आहे.
----
‘एथनिक ट्युन्स’ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे, ता. १ : चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या ‘एथनिक ट्युन्स’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवारपर्यंत (ता. ८) सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. या प्रदर्शनात भारतातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक संस्कृतीतील सुरेल लयबद्धतेचे दर्शन चित्रमालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आशेच्या किरणांवर जगणाऱ्या अदिवासी जीवनाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते मांडणाऱ्या चित्रांची ही मालिका आहे.