
नॅशनल स्टार्टअप अवॉर्डसाठी मागविले प्रस्ताव
पुणे, ता. २ ः तुमच्या स्टार्टअपला आता राष्ट्रीयस्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्टार्टअप इंडियाअंतर्गत राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रत्येक विभागातील विजेत्याला १० लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.
ऑक्टोबर २०२० पासून देशात नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड वितरित करण्यात येत आहे. केवळ स्टार्टअप्सला नव्हे तर त्यांना मोठे करणाऱ्या इनक्युबेटर आणि ॲक्सलरेटर्सलाही या पुरस्काराद्वारे गौरविण्यात येते. एकूण २० क्षेत्रातील समाजोपयोगी स्टार्टअप्सची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. विशेष म्हणजे विजेत्या स्टार्टअपला त्या क्षेत्रातील उद्योग अथवा सार्वजनिक क्षेत्रातील अस्थापनांसमोर सादरीकरणाची संधी मिळते. त्यातून स्टार्टअपला वाढीसाठीची पुढील दिशा प्राप्त होते. ३१ मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.
सहभागासाठी निकष ः
- स्टार्टअप हा वाणिज्य मंत्रालयाचा (डीपीआयआयटी) मान्यताप्राप्त असावा.
- राज्याच्या फर्मच्या निबंधकाकडून नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
- स्टार्टअपने बाजारातील समस्येचे समाधानासाठी हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली असावी
- व्यापार-विशिष्ट नोंदणी असणे आवश्यक आहे (उदा, जीएसटी, सीई, एमएसएमई)
- स्टार्टअपचे वय दहा वर्षांपेक्षा जास्त नसावे, तसेच त्याचाकडे स्वतःचा आर्थिक ताळेबंद असावा
मार्गदर्शक तत्त्वे
- या आधी विजेता स्टार्टअप सहभागी होऊ शकत नाही
- एक स्टार्टअप स्वतःला जास्तीतजास्त दोन श्रेणींमध्ये नामांकित करू शकतो
२०२२च्या स्टार्टअप पुरस्कारातील सहभागींचा तपशील
- स्टार्टअप्स ः २६००
- क्षेत्रे ः ५०
- इनक्युबेटर ः ५०
- ॲक्सलरेटर ः ७
- वैशिष्ट्यपूर्ण स्टार्टअप्स ः ४१
----
नोंदणीसाठी संकेतस्थळ ः https://www.startupindia.gov.in/