Mon, Sept 25, 2023

येरवडा कारागृहात नेत्र तपासणी
येरवडा कारागृहात नेत्र तपासणी
Published on : 25 May 2023, 2:16 am
पुणे, ता. २५ : येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्यातर्फे कारागृहातील १५९ बंदी व २५ कर्मचाऱ्यांची नेत्र, मोतीबिंदू तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे संचालक परवेझ बिलिमोरिया, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा उपस्थित होते. सुधारणा व पुनर्वसन या धोरणांतर्गत कारागृहातील बंदींकरीता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.