Electricity Bill Arrears : पुणे परिमंडलातील वीज ग्राहकांकडे १९१ कोटीची थकबाकी pune Electricity Bill Arrears | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL Electricity bill
पुणे परिमंडलातील वीज ग्राहकांकडे १९१ कोटीची थकबाकी

Electricity Bill Arrears : पुणे परिमंडलातील वीज ग्राहकांकडे १९१ कोटीची थकबाकी

पुणे - पुणे परिमंडलातील सर्व प्रकाराच्या ७ लाख ८८ हजार ८८१ वीजग्राहकांकडे १९१ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ६ लाख ८१ हजार २०८ ग्राहकांकडे १२१ कोटी ८१ लाख, वाणिज्यिक ९६ हजार ३१६ ग्राहकांकडे ४७ कोटी ३ लाख व औद्योगिक ११ हजार ३५७ ग्राहकांकडे २२ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून केले आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.

पुणे शहरात घरगुती ३ लाख २ हजार २३२ ग्राहकांकडे ४८ कोटी १८ लाख, वाणिज्यिक ४८ हजार ३५२ ग्राहकांकडे १९ कोटी ७८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार १३९ ग्राहकांकडे २ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. पिंपरी चिंचवड शहरात घरगुती १ लाख ३६ हजार ९१३ ग्राहकांकडे २६ कोटी १७ लाख, वाणिज्यिक २२ हजार १४९ ग्राहकांकडे ११ कोटी ५७ लाख, औद्योगिक ४ हजार २२६ ग्राहकांकडे १० कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती २ लाख ४२ हजार ६३ ग्राहकांकडे ४७ कोटी ४५ लाख, वाणिज्यिक २५ हजार ८१५ ग्राहकांकडे १५ कोटी ६८ लाख, औद्योगिक ३ हजार ९९२ ग्राहकांकडे ९ कोटी १ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे.