एअर मार्शल तिवारी यांची लोहगाव एअरफोर्स स्टेशनला भेट

एअर मार्शल तिवारी यांची लोहगाव एअरफोर्स स्टेशनला भेट

पुणे, ता. २५ ः भारतीय हवाईदलाच्या नैऋत्य मुख्यालयाच्या प्रमुख एअर मार्शल नर्मदेश्र्वर तिवारी व त्यांच्या पत्नी ऋचा तिवारी यांनी पुण्यातील लोहगाव येथील हवाईदल तळाला भेट दिली. या प्रसंगी लोहगाव हवाईदल तळाचे प्रमुख एअर कमोडर शेखर आणि त्यांच्या पत्‍नी व लोहगाव एअरफोर्स व्हाईव्हज वेल्फेअल असोसिएशनच्या (एएफएफडब्ल्यूए) सोनू यादव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
एअर मार्शल तिवारी यांनी नैऋत्य मुख्यालयाचे प्रमुखपदाचे कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसीय पुणे दौऱ्याचे नियोजन केले. या दौऱ्या दरम्यान त्यांना लोहगाव हवाईदल तळ येथे सुरू असलेल्या कामाचा तसेच विविध मोहिमांसाठी केली जाणाऱ्या तयारीबद्दल माहिती देण्यात आली. या वेळी तिवारी यांनी तळाच्या जवानांचे त्यांच्या लढाऊ तयारीबद्दल कौतुक केले, नवीन युगातील आव्हाने अधोरेखित करत त्यांना व्यावसायिक पद्धतीने हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com