पॅन्ट्रीकारमध्ये गॅस सिलिंडर; रेल्वेकडून चालकाला एक लाखाचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅन्ट्रीकारमध्ये गॅस सिलिंडर; 
रेल्वेकडून चालकाला एक लाखाचा दंड
पॅन्ट्रीकारमध्ये गॅस सिलिंडर; रेल्वेकडून चालकाला एक लाखाचा दंड

पॅन्ट्रीकारमध्ये गॅस सिलिंडर; रेल्वेकडून चालकाला एक लाखाचा दंड

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पॅन्ट्रीकारमध्ये गॅस सिलिंडर, शेगडी यांच्या वापरावर रेल्वे बोर्डाने बंदी घातली आहे. मात्र, सरार्सपणे पॅन्ट्रीकारमध्ये याचा वापर केला जात आहे. रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या पथकाने पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीची आकस्मिक तपासणी केली असता त्यात त्यांना गॅस सिलिंडर व शेगडी आढळून आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व प्रवासी सुरक्षितता धोक्यात आणल्याचा कारणास्तव वाणिज्य विभागाने संबंधित पॅन्ट्री चालकाला १ लाख रुपयांचा दंड केला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी पुणे स्थानकावर करण्यात आली.

पॅन्ट्रीकारमधील जेवणाचा दर्जा तर कधी चालकाकडून जास्तीच्या दराची आकारणी यासह अनेक तक्रारी पॅन्ट्रीविषयी रेल्वेला प्राप्त होतात. बुधवारी वाणिज्य विभागाच्या खानपान निरीक्षक ए. आर. अर्डे आणि निर्पिन बिस्वास यांनी झेलम एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीची पाहणी केली असता त्यांना त्यांत सिलिंडरसह अन्य प्रतिबंधित वस्तू आढळून आल्या. त्यांनी तत्काळ त्या वस्तू ताब्यात घेऊन संबंधित पॅन्ट्रीच्या चालकाला १ लाख रुपयांचा दंड केला. तसेच पुढील कार्यवाहीसाठी ‘आयआरसीटीसी’ला कळविण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे व सहाय्य्क वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.