Wed, October 4, 2023

‘स्त्री शक्ती समाधान’ शिबीराचे बुधवारी आयोजन
‘स्त्री शक्ती समाधान’ शिबीराचे बुधवारी आयोजन
Published on : 26 May 2023, 1:59 am
पुणे, ता २६ : महिलांसाठी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व्हावी, त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे बुधवारी (ता. ३१) आयोजन केले आहे. हे शिबिर पौड फाटा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर मुलींची शाळा क्र. ७४ येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होईल. शिबिराला विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन बाल विकास विभागाने केले आहे.