स्काउट गाइड अनिवार्य
करणार ः केसरकर

स्काउट गाइड अनिवार्य करणार ः केसरकर

पुणे, ता. २६ ः विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवायला हवी. व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाइड अनिवार्य करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासगी शाळांच्या वाढत्या मक्तेदारी विषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात पालकांना आर्थिकदृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये.’’
ते म्हणाले, ‘‘या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला जेवढी शिस्त लावता येईल, तेवढा प्रयत्न आम्ही करतोय. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस आधीच गणवेश आणि तीन दिवस आताचा नवा गणवेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

‘शिक्षक भरती पूर्ण करणार’
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भरती संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक भरतीला पाच जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ती उठल्यावर आम्ही तातडीने शिक्षक भरती पूर्ण करू, राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेला शिक्षक मिळणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com