द यूथ कॉस्मोतर्फे ‘अर्थ कट्टा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द यूथ कॉस्मोतर्फे ‘अर्थ कट्टा’
द यूथ कॉस्मोतर्फे ‘अर्थ कट्टा’

द यूथ कॉस्मोतर्फे ‘अर्थ कट्टा’

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘द यूथ कॉस्मो इको एज्युकेशनल इन्हिशिएटिव्ह’ संस्थेच्या वतीने ‘अर्थ कट्टा’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ ‘जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन’ यावर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.

विज्ञान शाखेतील तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि पुण्यातील काही जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन ‘अर्थ-कट्टा’ हा सर्व वयोगटांसाठी खुला मंच सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम रविवारी (ता. २८) होणार असून त्यामध्ये निसर्ग व मानवाचा सतत सुरू असलेला संघर्ष, हवामान बदल, प्राणी-वनस्पतींचे महत्त्व, धोक्यात असलेल्या प्रजाती, जंगलतोड, कॉंक्रिटांचे वाढते जंगल, अशा विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन, विविध हँड्य ऑन ॲक्टिव्हिटी, खेळ आदींचा यात समावेश आहे. येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थाने निसर्गाशी जोडणे व त्यातून निसर्ग संवर्धन करणे, हा यामागचा उद्देश आहे. तर हा कार्यक्रम रविवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजता पत्रकार नगर येथील कला छाया कल्चरल सेंटर येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.