स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलनाचे ४ जूनला आयोजन अध्यक्षपदी मधुर भांडारकर तर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्कीन सिटी चित्रपट रसिक 
संमेलनाचे ४ जूनला आयोजन

अध्यक्षपदी मधुर भांडारकर तर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन
स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलनाचे ४ जूनला आयोजन अध्यक्षपदी मधुर भांडारकर तर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन

स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलनाचे ४ जूनला आयोजन अध्यक्षपदी मधुर भांडारकर तर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्यावतीने (पश्चिम विभाग) स्कीन सिटी चित्रपट रसिक संमेलन ४ जून रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते मधुर भांडारकर यांची निवड केली आहे. तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष संयोजन वीरेंद्र चित्राव आणि स्कीन सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन ढेपे यांनी दिली.

यानिमित्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘नेक्स्टजेनइनोव्ह ८’चे डायरेक्टर राहुल जैन, सचिव दिलीप बापट आणि ‘आशय’चे सचिव सतीश जकातदार उपस्थित होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हे संमेलन सकाळी दहा ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमात फेडरेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर भांडारकर यांची प्रकट मुलाखत सकाळी सव्वाअकरा वाजता होणार आहे. कार्यक्रमात अभिनेत्री अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, अभिनेता-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर, सुधीर जोगळेकर, निखिल महाजन आदी मान्यवर विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी ‘रूपवाणी’ हा विशेष अंक प्रकाशित केला जाणार आहे. ‘फिल्म सोसायटी चळवळीने आम्हांस काय दिले?’, ‘चित्रपट संस्कृतीचे बदलते प्रवाह’ या विषयांवर परिसंवाद होणार आहे. तर ‘फिल्म क्लब समोरील आव्हाने व उपाय’ विषयावर मुक्त चर्चा होणार असल्याचे चित्राव यांनी सांगितले.