मंचरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार

आमदार गोपीचंद पडळकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

मंचरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार आमदार गोपीचंद पडळकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

पुणे, ता. २६ ः मंचर (ता. आंबेगाव) येथे लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेऊन तिला घरात कुलूप लाऊन कोंडून ठेवल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी (ता.२६) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे या लव्ह जिहादच्या रॅकेटमध्ये कोण-कोण आहेत, याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या मुलीच्या पालकांनी ‘द. केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर ही सर्व घटना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितली. त्यानंतर हे कार्यकर्त्यांच्या मदतीने तिच्या परिवाराने त्या मुलाच्या ताब्यातून तिला सोडवून आणले. याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण तिच्या परिवाराकडे उपलब्ध आहे. या मुलीच्या अंगावर सिगारेटच्या साहाय्याने चटके दिल्याचे डाग आहेत. तीला काही गैरप्रकार करण्यास भाग पाडले आहे. यासंदर्भात मी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना भेटून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला असल्याचे पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

या मुलीचे धर्मांतर केल्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेतील आरोपी मुलगा सध्या कारागृहात असल्याचे पडळकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ही मुलगी आणि मुलगा हे २०१९ मध्येच घरातून पळून गेले होते. त्यावेळी मंचर पोलिस ठाण्यात २३ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. हे दोघेही पंधरा दिवसांपूर्वी परत आले. परत आल्यानंतरही ती मुलगी मुलाकडे सासरी राहत होती. तरीसुद्धा संबंधित मुलावर गुन्हा दाखल असल्याने त्या गुन्ह्यात त्याला अटक केले आणि पुन्हा नव्याने बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो मुलगा तुरुंगात आहे, असे मंचर पोलिसांकडून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com