Sun, October 1, 2023

‘रोटरी क्लब’तर्फे महिलांसाठी उपक्रम
‘रोटरी क्लब’तर्फे महिलांसाठी उपक्रम
Published on : 27 May 2023, 1:59 am
पुणे, ता. २७ ः महिला, नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट भरविण्यात आले. यामध्ये १०० हून अधिक महिला नव उद्योजिकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अनिल परमार, डॉ. ऋचा वझे-मोकाशी, रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष पद्मजा जोशी, सचिव अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी आदी उपस्थित होते.